बाबासाहेबांचे वडील रामजीबाबा धार्मिक, कबीरपंथीय. लष्करात असूनही मद्याच्या थेंबालासुद्धा शिवत नव्हते. हाच वैचारिक वारसा बाबासाहेबांना मिळाला. म्हणूनच बाबासाहेब निरीश्वरवादी बनले. त्याची कारणे त्यांच्या बालपणीच्या संस्कारांत दडलेली आहेत.
कोलंबिया विद्यापीठाने ‘डॉक्टर आॅफ लॉ’ या महान पदवीसाठी जगातील पाच पंडितांची निवड केली. त्यात प्रमुख नाव होते डॉ. आंबेडकर - एकमेव भारतीय. ‘भारतीय घटनेचे शिल्पकार, एक महान सुधारक, मानवी हक्काचे आधारस्तंभ असणारे महापराक्रमी पुरुष डॉ. बी. आर
आंबेडकर’ अशा शब्दांत सन्मानाने नाव पुकारले गेले तेव्हा टाळ्यांच्या कडकडाटात अंगावरील गाऊन सांभाळत ‘डॉक्टर आॅफ लॉ’ पदवीचा स्वीकार त्यांनी केला. संपूर्ण भारतातून विद्येचे महान यश एकाच व्यक्तीला का मिळाले, असा प्रश्न सहज पडतो. हे मानवी रसायन समजून घेताना बाबासाहेब विद्याव्यासंगी कसे झाले, त्यांच्या पूर्वजांची पार्श्वभूमी समजून घेणे महत्त्वाचे वाटते.कोलंबिया विद्यापीठाने ‘डॉक्टर आॅफ लॉ’ या महान पदवीसाठी जगातील पाच पंडितांची निवड केली. त्यात प्रमुख नाव होते डॉ. आंबेडकर - एकमेव भारतीय. ‘भारतीय घटनेचे शिल्पकार, एक महान सुधारक, मानवी हक्काचे आधारस्तंभ असणारे महापराक्रमी पुरुष डॉ. बी. आर
बाबासाहेबांचे आजोबा मालोजीराव ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या मुंबई आर्मीमध्ये नोकरीला होते. बाबासाहेबांचे वडील (रामजी व त्यांचे दोन भाऊ) लष्करात भरती झाले. तिसरे भाऊ जातीयतेच्या मानहानीमुळे साधूंच्या झुंडीत सामील झाले. ती त्या काळातली बंडखोरी होती. थोडक्यात जातीची ओळख कायमची बुजवली जायची. बाबासाहेब पोरके झाल्यावर त्यांची आत्या मीराबाई त्यांचे लाड पुरवायची, नव्हे शिस्तसुद्धा लावायची. बाबासाहेबांचे आजोबा (आईचे वडील) सुभेदार धर्मा मुरबाडकर हे मराठा पलटणीतून रामजी (बाबासाहेबांचे वडील) यांच्या पलटणीत बदलून आले होते. सुभेदार मुरबाडकर घरचे सधन होते. त्यांना दोन मुली व एक मुलगा अशी तीन मुले होती. तेरा वर्षांची मुलगी भीमाबाई हिचे लग्न रामजींशी 1865 च्या सुमारास झाले. 1865 च्या दरम्यान भीमाबाईच्या वडिलांना दोनशे पंचवीस रुपये पगार होता. महाराष्ट्रात अस्पृश्यांच्या घरात त्या वेळी चांदीच्या ताटात जेवणारा मुरबाडकर परिवार होता. मुरबाडकर परिवारात (ठाणे जिल्ह्यात) सहा जण सुभेदार-मेजर पदावर काम करत होते. थोडक्यात, बाबासाहेबांची आई मोठ्या सुखात वाढली होती. पण रामजींचे घर सधन नव्हते. त्यामुळे या लग्नाला विरोध होता. रामजींचे वागणे-बोलणे-राहणे मात्र सुसंस्कृत होते. त्यामुळेच भीमाबार्इंचे लग्न रामजींशी झाले. भीमाबाई स्वाभिमानी होत्या. त्या आर्थिक मदतीसाठी कधीही माहेरी यायच्या नाहीत.
त्या काळात लष्करी कँपात राहणाºया मुला-मुलींना शिक्षण घेणे सक्तीचे होते. जी मुले-मुली शिक्षण घेणार नाहीत, त्यांना मोठ्या रकमेचा दंड भरावा लागे. ज्या काळात ब्राह्मण मुलींना शिक्षण घेणे अवघड होते, त्या काळात महार समाजातील मुली पांडवप्रताप, रामविजय, शिवलीलामृत आदी पौराणिक व धार्मिक ग्रंथ वाचत, त्याची पारायणे व श्रोतृवंदास निरूपणही करत. रामजींनी लष्करातील नॉर्मल परीक्षा दिली होती. ती परीक्षा मॅट्रिकच्या बरोबरीची गणली जायची. इतिहास-गणित-इंग्रजी या विषयांवर रामजींनी प्रभुत्व मिळवलेले होते. शिक्षकी शास्त्राचा डिप्लोमा मिळवला होता. सैनिकी शाळेवर ते मुख्याध्यापक होते. रामजींनी तर्खडकर भाषांतर मालेचे तीन भाग बाबासाहेबांकडून पाठ करून घेतले होतेच. ‘इंग्रजी भाषा अवगत करण्यासाठी तू हार्वर्डची पुस्तके तोंडपाठ कर’ ही सक्ती ते आपल्या मुलावर करत. एवढेच नव्हे, तर अभ्यासाला छोट्या भीमाला पहाटे उठवण्यासाठी ते रात्रभर जागे राहत. मराठी भाषेतील शब्दांना योग्य इंग्रजी प्रतिशब्द हुडकून काढण्यास व योग्य उपयोग करण्यास त्यांनी छोट्या भीमाला सांगितले आणि मुलगा हा अभ्यास नीटपणे करतो की नाही याचे सूक्ष्म निरीक्षण रामजी करत. रामजीबाबा तसे धार्मिक आणि कबीर पंथीय होते. लष्करात असूनही मद्याच्या थेंबालासुद्धा शिवत नव्हते. हाच वैचारिक वारसा, शैक्षणिक वारसा बाबासाहेबांना मिळाला. म्हणूनच बाबासाहेब निरीश्वरवादी बनले. त्याची कारणे त्यांच्या आधीच्या संस्कारांतून आलेली आहेत.
1896 मध्ये बाबासाहेब शाळेत दाखल झाले. तेव्हा त्यांचे वडील पहाटे भूपाळ्या-स्तोत्रे म्हणत. पुन्हा सायंकाळी दोन तास मुलांबरोबर पूजाअर्चा होई. प्रार्थनेनंतर कबीराचे दोहे, तुकाराम, चोखोबाचे अभंग, दत्ताची स्तोत्रे, गीतेतील श्लोकांची पारायणे (म्हणजे त्या काळात ब्राह्मणांपेक्षा काकणभर सरस) व्हायची. आणि हे झाल्यावर रामजींच्या घरात मुलांची खºया अर्थाने स्पर्धा असायची, अर्थात पाठांतराची. अशा संस्कारांत बाबासाहेब वाढले. पण असे सगळे सोज्वळ संस्कार होत असताना बाबासाहेब शाळेत गेल्यावर त्यांना मात्र शाळेच्या बाहेर बसवले जायचे. शाळेची हजेरी सक्तीची होती. अशा त्या अवस्थेत बाबासाहेबांच्या मनात बालपणीच भारतीय संस्कृतीविषयी चीड निर्माण झाली होती. ती मानसिकता त्यांना आयुष्यभर सतावत होती. अगदी त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत. असे असले तरी वर्गाबाहेर काढणाºया शिक्षकांविषयी आदर होता. थोडक्यात, चुणचुणीत भीमराव हुशार असूनही जातीच्या चौकटीमुळे त्यांचे प्रचंड शालेय नुकसान होत होते. त्यातच त्यांच्या स्पृश्य आंबेडकर गुरुजींनी मात्र एक निर्मळ प्रेमाचा धागा विणून ठेवला. तो धागा बाबासाहेब विसरू शकले नाहीत. बाबासाहेबांच्या शालेय-कॉलेज-शिक्षणानंतर उच्च शिक्षणासाठी परदेशात गेल्यावर त्यांच्या आंबेडकर गुरुजींना बाबासाहेबांची आठवण व्हायची. आपल्या शिष्याला आपण कधी भेटू, असे त्यांना सारखे वाटे.
ज्या आंबेडकर गुरुजींनी बाबासाहेबांच्या शालेय पटावर आंबेडकर आडनाव नोंदवले, ते गुरुजी आणि बाबासाहेबांची प्रत्यक्ष भेट झाल्यावर गुरुजी म्हणाले, ‘भीमराव, तू तुझ्या कुळाचेच नव्हे तर माझ्या कुळाचेसुद्धा नाव अजरामर केलेस. नकळत मला तू बहुमानित केले आहेस.’ त्यावर बाबासाहेब म्हणाले, ‘गुरुजी, मी अजून कमाईला सुरुवात केली नाही. फूल ना फुलाची पाकळी म्हणून तुम्हाला गुरुदक्षिणा द्यावी अशी माझी इच्छा आहे.’ त्यावर गुरुजी म्हणाले, ‘भीमराव, अरे तू एवढी विद्या संपादन केलीस, तीच मला खºया अर्थाने गुरुदक्षिणा. जगात तुझा नावलौकिक व्हावा एवढीच माझी इच्छा.’ त्यानंतर राउंड टेबल कॉन्फरन्सला बाबासाहेब जाताना त्यांना गुरुजींनी हृदयस्पर्शी पत्र लिहिले. ते बाबासाहेबांनी जपून ठेवले.1920 मध्ये ग्रेजइनमध्ये बॅरिस्टर परीक्षेसाठी प्रवेश घेतला तेव्हा बाबासाहेब रात्रभर जागून अभ्यास करत. त्या काळात त्यांच्या खोलीतील भारतीय विद्यार्थी बाबासाहेबांना सांगत, ‘अहो आंबेडकर, रात्र फार झाली हो. आता विश्रांती घ्या.’ तेव्हा बाबासाहेब म्हणत, ‘मित्रांनो, अन्नाला पैसा आणि झोपायला मला वेळ नाही. मला माझा अभ्यासक्रम लवकर पुरा करायचा आहे.’ त्याच काळात अस्नोडकर, मुखर्जी, नायडू, माथूर, देसाई, हाजी, कुडाळकर असे अनेक विद्यार्थी तिथल्या (लंडनच्या) वसतिगृहात राहत. खºया अर्थाने अभ्यासात दंग असणारे (अठरा-अठरा तास) बाबासाहेब हे एकमेव भारतीय विद्यार्थी होते.
अशा या महामानवाच्या व्यासंगीपणावर भरभरून लिहिता येईल. कोणताही महामानव शून्यातून भरारी मारून आपले उत्तुंग मानवी जगणे इतिहासाच्या पानापानावर कोरून ठेवतो, तेव्हा त्यांच्या मुळाशी गेल्यावर त्यांच्यावर संस्कार करणाºया अनेक गोष्टी कळायला लागतात. आज त्यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांच्या विचारांना सलाम, अभिवादन. दोन ओळींची (दत्ता जाधव लिखित) ‘गझल’ बरेच काही सांगून जाणारी आहे.
रे भीमा तुझ्या कृपेने, जगणे तर सोपे झाले
गुंत्यातून अंधाराच्या, निघणे तर सोपे झाले
संदर्भ :-दै. दिव्य मराठी , दि. १३ एप्रिल २०१२
No comments:
Post a Comment