Sunday 12 June 2016

कसली तुमची जात-धर्म बोडक्याची लावून धरली तुम्ही??

कसली तुमची जात-धर्म बोडक्याची लावून धरली तुम्ही??
ऑनर किलिंग करू नका.. प्रेम युगलानामारू नका.. जन्माला घातलेला माणूस आहे.. कसली तुमची जात-धर्म बोडक्याची लावून धरली तुम्ही?? आहे काय तुमच्याकडे मराठा असणं.. ब्राम्हण असणं.. मुसलमान असणं.. बौद्ध असणं.. हिंदू असणं.. म्हणजे काय असतं..?? तोडाने खाता आणि बुडाने हागतात ना तुम्ही लोक?? कशाची जात-धर्म लावून धरली तुम्ही.. माणसाची औलाद आहात.. एवढा जर जातीचा ठेका घेतला ना तुम्ही सिद्ध करून दाखवावे जात-धर्म म्हणजे काय?? आम्ही उलटीकडून खातो आणि उलटीकडून करतो हे तुम्ही दाखवावं... तुमच्या चेतना.. संवेदना.. वेदना मानवी एकसारख्या आहेत.. हो प्रेम होणार आणि ते नर मादी.. स्त्री पुरुषात होणार तुमचा जाती-धर्म बघून प्रेम नाही होत.. जगा ना हो भारतीय संविधानानुसार माणूस म्हणून जगा...
बस झाली तुमची जात-धर्म वाटोळा केल हो तुम्ही या देशाचं... किती मने तोडणार तुमच्या खोट्या इज्जतीसाठी?? तुमच्या जात-धर्मामुळे कित्येक मने तुटलेली पाहिलं आहे. या देशाच्या कित्येक पिढ्याच या जाती-धर्म वाल्यांनी प्रेमाच्या बाजून वाटोळा करून टाकलं आहे. एक लक्षात घ्या एकावर प्रेम आणि जातीच्या नावाने दुसर्याशी लग्न हा बदफैलीपणा आहे.
सगळ्याच्या सगळ्या जाती क्रूर आणि विकृत झाल्या आहे. तुमच्या जातीधर्माच्या अस्मिता स्त्री देहावर नका बघू हो.. तुम्ही फार किळसवाना वागत आहात.. पुरुषाची जात काहीही असली तरी चालेल पुरुषाने दुसऱ्या जाती-धर्माच्या बाईशी लग्न केलं तरी चालेल फक्त स्त्री ने ते करू नये हे जे तुमच्या अस्मितीचे खेळ चालू आहे हे बंद करा हो... स्त्री ला कृपया माणूस म्हणून कबुल करा हो तिला ही मन असतं मेंदू असतों शरीर असतं तिला स्वतंत्र्य द्या माणूस म्हणून जगण्याचं !!
विचार- राजन खान सर
धन्यवाद- आयबीन लोकमत
सदर लेख हा  इथुन संकलीत केला आहे

जातनिर्मूलन

आज सकाळी दूध घ्यायला भय्याकडे गेलो.. तिकडे एक दारुडा उभा होता तो बहुतेक त्या भय्यांचा मित्र असावा.. त्या दारुड्याच्या डोक्याला लागलें होते पट्टी बांधली होती तरी रक्त टपकत होतं... भय्यां त्या दारुड्या ला म्हणाला.. जो दारू पिता ना वो कभी सुखी नही रहेता... त्याला भय्यां म्हणाला कितने बेटे हें? दारुडा म्हणाला २... भय्यां म्हणाला शादी हुई होगी.. बहू-लाडके अलग हुये होंगे?? दारुड्याने मान डोलवून होकारअर्थी मान डोलवली... भय्यां म्हणाला देखा उपरवाले की लकडी का आवाज नही होता.. मी शांतपणे गप्पा ऐकत होतो... पुढे भय्यां दारुड्याला म्हणाला तुम्हे लडकी हे?? दारुडा हो म्हणाला.. १ लडकी हें.. *भय्यां म्हणाला लडकी की शादी करनी हे क्या?? एक मारवाडी हे.. बहोत पैसे और खेती हें.. अच्छा काम हे लडका मेहनती हें... तुम्हारे लडकी के नाम प्लांट करेगा तब करना शादी.. वो तुम्हे दहेज भी देगा.. दारुडा शांतपणे ऐकत होता.. मग भय्यां माझ्याकडे बघून म्हणाला.. वो क्या हे ना मारवाडी मे लडकी नी मिलती हे भाई.. वैसे भी लडकी अपने घर आई की वो अपनी हो जाती हे.. बराबर ना... मी एक स्माईल दिली आणि निघालो.. मनात विचार आला अश्याच जाती संपणार निदान मनातून तरी जातनिर्मूलन होईल !!
प्रबोधन- जगाला घडवण्याआधी स्वतःला घडवूया's photo.
सदर लेख हा  इथुन संकलीत केला आहे