Sunday, 12 June 2016

कसली तुमची जात-धर्म बोडक्याची लावून धरली तुम्ही??

कसली तुमची जात-धर्म बोडक्याची लावून धरली तुम्ही??
ऑनर किलिंग करू नका.. प्रेम युगलानामारू नका.. जन्माला घातलेला माणूस आहे.. कसली तुमची जात-धर्म बोडक्याची लावून धरली तुम्ही?? आहे काय तुमच्याकडे मराठा असणं.. ब्राम्हण असणं.. मुसलमान असणं.. बौद्ध असणं.. हिंदू असणं.. म्हणजे काय असतं..?? तोडाने खाता आणि बुडाने हागतात ना तुम्ही लोक?? कशाची जात-धर्म लावून धरली तुम्ही.. माणसाची औलाद आहात.. एवढा जर जातीचा ठेका घेतला ना तुम्ही सिद्ध करून दाखवावे जात-धर्म म्हणजे काय?? आम्ही उलटीकडून खातो आणि उलटीकडून करतो हे तुम्ही दाखवावं... तुमच्या चेतना.. संवेदना.. वेदना मानवी एकसारख्या आहेत.. हो प्रेम होणार आणि ते नर मादी.. स्त्री पुरुषात होणार तुमचा जाती-धर्म बघून प्रेम नाही होत.. जगा ना हो भारतीय संविधानानुसार माणूस म्हणून जगा...
बस झाली तुमची जात-धर्म वाटोळा केल हो तुम्ही या देशाचं... किती मने तोडणार तुमच्या खोट्या इज्जतीसाठी?? तुमच्या जात-धर्मामुळे कित्येक मने तुटलेली पाहिलं आहे. या देशाच्या कित्येक पिढ्याच या जाती-धर्म वाल्यांनी प्रेमाच्या बाजून वाटोळा करून टाकलं आहे. एक लक्षात घ्या एकावर प्रेम आणि जातीच्या नावाने दुसर्याशी लग्न हा बदफैलीपणा आहे.
सगळ्याच्या सगळ्या जाती क्रूर आणि विकृत झाल्या आहे. तुमच्या जातीधर्माच्या अस्मिता स्त्री देहावर नका बघू हो.. तुम्ही फार किळसवाना वागत आहात.. पुरुषाची जात काहीही असली तरी चालेल पुरुषाने दुसऱ्या जाती-धर्माच्या बाईशी लग्न केलं तरी चालेल फक्त स्त्री ने ते करू नये हे जे तुमच्या अस्मितीचे खेळ चालू आहे हे बंद करा हो... स्त्री ला कृपया माणूस म्हणून कबुल करा हो तिला ही मन असतं मेंदू असतों शरीर असतं तिला स्वतंत्र्य द्या माणूस म्हणून जगण्याचं !!
विचार- राजन खान सर
धन्यवाद- आयबीन लोकमत
सदर लेख हा  इथुन संकलीत केला आहे

1 comment:

  1. Pokies for Sale | online casino | KadangPintar
    For over thirty years, the company has been developing casino worrione gaming 온카지노 solutions. All of their games 메리트카지노 are designed for the home-

    ReplyDelete